राज्यासाठी ९.५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे कोठून आणणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST2021-06-30T04:13:48+5:302021-06-30T04:13:48+5:30
सरकारचे संगनमत... बाजारपेठेशी संगनमत करून सरकारने बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. म्हणूनच ...

राज्यासाठी ९.५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे कोठून आणणार?
सरकारचे संगनमत...
बाजारपेठेशी संगनमत करून सरकारने बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. म्हणूनच २२०० ऐवजी ४ हजार रुपये दराने बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तफावतीची रक्कम सरकारने टाकावी, अशी मागणीही माजी मंत्री निलंगेकर यांनी केली.
दुबार पेरणी अन् बोगस बियाणे...
पावसाने उघडिप दिल्याने पहिल्यांदा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्याचवेळी बाजारात बियाणांची टंचाई आहे. शिवाय, उपलब्ध केलेले बियाणे बोगस निघून राज्याच्या ४३.५ लाख हेक्टरवरील सोयाबीनची उगवण पूर्ण क्षमतेने होणार नाही, असा आरोपही माजी आ. निलंगेकर यांनी केला आहे.
मातीचे खत, खताची माती...
५२ लाख मेट्रिक टन खताची मागणी आहे. २२ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्याचीही टंचाई निर्माण करून मातीचे खत आणि खताची माती केली जाईल आणि शेतकऱ्यांवरील हा अन्याय महापाप असून, महाआघाडीला ते भोगावे लागेल, असा आरोपही आ. निलंगेकर यांनी केला.