रेल्वेचा मासिक पास कधी सुरू होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:31+5:302021-09-25T04:19:31+5:30

पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच... कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लातूर स्थानकावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना ...

When will the monthly train pass start? | रेल्वेचा मासिक पास कधी सुरू होणार ?

रेल्वेचा मासिक पास कधी सुरू होणार ?

पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लातूर स्थानकावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे तिकीट काढावे लागत आहे. सध्या मुंबई, कोल्हापूर या रेल्वे सुरू असल्या तरी पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे...

लातूर-मुंबई

बीदर-मुंबई

नांदेड-पनवेल

कोल्हापूर-धनबाद

कोल्हापूर-नागपूर

हैदराबाद-हडपसर

लातूर-यशवंतपूर

भुर्दंड किती दिवस सहन करायचा...

लातूरहून परळी, उस्मानाबादला जाण्यासाठी मासिक पास काढला होता. मात्र, कोरोनामुळे काही दिवस रेल्वे बंदच हाेती. आताही रेल्वे सुरू असून, पॅसेंजर मात्र बंदच आहे. त्यामुळे अधिकचे भाडे भरावे लागत आहे. मासिक पास सुरू करावा. - ऋषिकेश महामुनी

लातूरहून केवळ एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पॅसेंजर सुरू होत नाही. रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. - काकासाहेब ढोले

मुंबईला जाण्यासाठी लातूरहून रेल्वे असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, जवळच नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्यांना पास बंद असल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे रेल्वेने लक्ष द्यावे.- तौफिक शेख

वरिष्ठ स्तरावरून होणार निर्णय...

सध्या सात रेल्वे लातूरहून धावतात. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय होईल. त्यानंतर अंमलबजावणी केली जाईल. सध्या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - बी.के. तिवारी, स्टेशन प्रबंधक

Web Title: When will the monthly train pass start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.