कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावतेय चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:41+5:302021-05-21T04:20:41+5:30
आतापर्यंत जिल्ह्यात ८६ हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात युवकांचाही समावेश आहे. विशेषत: घरातील ज्येष्ठांना कोरोनामुळे घराबाहेर पडता ...

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी; ज्येष्ठांना सतावतेय चिंता !
आतापर्यंत जिल्ह्यात ८६ हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात युवकांचाही समावेश आहे. विशेषत: घरातील ज्येष्ठांना कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे युवा मंडळींवरील कामकाज वाढले आहे. घरातील विविध कामे असोत, शेती असो किंवा इतर कामे, याची जबाबदारी युवकांनाच पार पाडावी लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून आरोग्य अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मध्यंतरी १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले हाेते. मात्र, लसीच्या कमी पुरवठ्यामुळे ते बंद करण्यात आले. आता केवळ ४५ पेक्षा अधिक वयोगटाला लस दिली जात आहे. परिणामी, तरुणांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी !
घरातील युवकांना विविध कामानिमित्त बाहेर जावे लागते. युवक काळजी घेत आहेत. घरी ज्येष्ठ असल्याने कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मुलांची काळजी वाटत असून, शासनाने तरुणांचे लसीकरण वेळेत करावे.
- पालक
सध्या कोरोनामुळे शेतीची कामे मुलेच बघत आहेत. खरीप हंगामामुळे शेतीसाहित्य खरेदीसाठी बाहेर जावे लागते. त्यातच रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. तरुणांचे लसीकरण करून त्यांनाही सुरक्षित करावे.
- पालक
कामासाठी घरातील तरुणांना बाहेर जावेच लागते. घरातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे तरुणांना शासनाने प्राधान्याने लस द्यावी. लसीमुळे युवक सुरक्षित होतील अशी आशा आहे.
- पालक
वयोगट पहिला डोस दुसरा डोस
४५ पेक्षा अधिक १,७४,५०७ ४४,६६६
१८-४४ ५३,०४४ ००००
आतापर्यंती स्थिती २,७९,११९ ६९,४६९