शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

फटाक्याने भाजले तर काय कराल? डॉ. लहानेंनी सांगितला उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 22:31 IST

हजारो लोकांना फटाक्यांमुळे इजा; सर्वात प्रथम भाजलेला भाग पाण्याखाली धरा : डॉ. विठ्ठल लहाने 

धर्मराज हल्लाळे

लातूर : दिवाळीचा सण हा आनंदाचा आणि दीपोत्सवाने साजरा करण्याचा आहे. त्यामुळे फटाकेमुक्तदिवाळी साजरी करा असे सांगत प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले, असुरक्षित फटाके फोडल्याने हजारो लोक दरवर्षी जखमी होतात. त्यापासून दूर राहा. मात्र दुर्घटना घडलीच तर योग्य उपचार करा. भाजलेला भाग पहिल्यांदा पाण्याखाली धरा. 

फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश दिला जात असला तरी अनेकजण मोठ्या उत्साहात फटाके फोडतात. हजारो दुर्घटना घडतात. त्यावर काय उपाय योजावेत, यासंदर्भात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, फटाक्यामुळे भाजूच नये याची काळयी घ्या. त्यासाठी प्रत्यक्ष हाताने फटाक्याची वात पेटवू नका. त्यासाठी काठीचा आधार घ्या. फटाका पेटल्यानंतर दूर अंतरावर थांबा. फटाके माती, वाळू, खडी व मुरुम असलेल्या ठिकाणी फोडू नयेत. तिथे स्फोट होऊन ती खडी, मुरुम उडून चेहऱ्यावर इजा होऊ शकते. लहान मुलांसोबत तिथे मोठ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे. 

असुरक्षित फटाके फोडल्याने शरिराच्या कोणत्या भागाला जास्त इजा होते? या प्रश्नावर ते म्हणाले, हात व चेहऱ्याला इजा अधिक होते. अनेकांचा हात निकामी होतो. चेहºयावर खडे उडून डोळ्यात ते जातात. अनेकांना अंधत्व येण्याची शक्यता असते. अनावधानाने भाजलेच तर काय उपचार करावेत? या संदर्भात डॉ. लहाने म्हणाले, भाजलेला भाग वाहत्या पाण्याखाली धरा किंवा स्वच्छ बकेटात पाणी घेऊन त्यात ठेवावा. चेहºयावर भाजले असेल तर स्वच्छ टॉवेल थपित ओला करून तो चेहºयावर ठेवावा. ही प्रक्रिया ३० मिनिटे करावी. कारण जेव्हा भाजते, तेव्हा आपल्या चामडीतील कोलॅजन नावाचा घटक पेट घेत असतो. तसेच भाजलेल्या भागात खूप आग पडलेली असते. ती आग पूर्णपणे थांबेपर्यंत पाणी ओतण्याची व पाण्यात हात ठेवण्याची किंवा थपथपीत ओला टॉवेल भाजलेल्या भागावर ठेवण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. ज्यामुळे भाजलेली जखम खोलवर जात नाही. जखम लवकर भरली, तर डागही लवकर भरतात. अन्यथा जखम भरण्यास वेळ लागतो. डाग पडतात, व्यंग येते. 

प्रथमोपचार केल्यानंतर पुढे काय करावे, याअनुषंगाने डॉ. लहाने म्हणाले, तद्नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज करावा. अनेकजण भाजलेल्या भागावर पाणी टाकले की फोड येते म्हणतात काय करावे, या प्रश्नावर ते म्हणाले, फोड येणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते फोड येणे म्हणजे जखम भरण्याची योग्य प्रक्रिया असते. केवळ ते फोड फोडू नये. जर एखादा फोड मोठा झाला, त्यावरची चामडी खूप पातळ झाली, तर फोडाच्या एका बाजूने स्टराईल निडलचा वापर करून त्यातील पाणी काढावे. भाजलेला भाग उघडा ठेवू नये. त्यावर ड्रेसिंग करणे आवश्यक असते. ज्यामुळे इन्फेक्शन टळते असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, भाजल्यापासून सहा तासांच्या आत पट्टी केली तर जखम लवकर भरते. 

भाजलेल्या भागावर टूथपेस्ट, मेंदी, शाई, मिरची पावडर लावणे असे अघोरी प्रकार घडतात. मुळात त्यामुळे इन्फेक्शन वाढते. मिरची पावडर लावणे आणि फोड येणे याचा काहीही संबंध नाही, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. फटाक्यांमुळे भाजल्याने लातूर शहरातील एकट्या लहाने हॉस्पिटलमध्ये १५० ते १६० रुग्ण येतात. प्रबोधन केल्याने फटाक्याने गंभीर भाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, किरकोळ प्रकार सुरूच आहेत. ज्यामुळे दिवाळ सणाच्या उत्साहात अनेकांना त्रास सोसावा लागतो. फटाक्याचे व्रण पडतात, पण त्यावर प्रथमोपचार म्हणजेच पाणी टाकणे तर व्रण कायम राहण्याची शक्यता कमी होते. माझ्या गेल्या १८ वर्षांच्या अनुभवात लातूर शहरात प्रत्येक दिवाळ सणात ३५० ते ४०० रुग्ण भाजल्याने रुग्णालयात येतात. हे सर्व आपण टाळू शकतो आणि दिवाळी आनंदात साजरी करू शकतो, असेही डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.

टॅग्स :fire crackerफटाकेDiwaliदिवाळीlaturलातूरdoctorडॉक्टर