श्री गणरायाचे जल्लाेषात स्वागत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:47+5:302021-09-11T04:21:47+5:30
उत्साह आणि आनंदाची पर्वणी असलेल्या श्री गणेशाेत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यानिमित्त लातूर शहरातील बाजारपेठेतील दुकाने सजली हाेती. काेराेनाच्या संकटामुळे ...

श्री गणरायाचे जल्लाेषात स्वागत...
उत्साह आणि आनंदाची पर्वणी असलेल्या श्री गणेशाेत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यानिमित्त लातूर शहरातील बाजारपेठेतील दुकाने सजली हाेती. काेराेनाच्या संकटामुळे गणेशभक्तांनी गत दाेन दिवसांपासूनच श्रींच्या मूर्ती खरेदीस प्रारंभ केला हाेता. तरीही शुक्रवारी दिवसभर लातूरच्या बाजारपेठेत मूर्तीसह पूजेचे साहित्य खरेदीला माेठी गर्दी हाेती.
इकाे फ्रेंडली गणेशा...
घराेघरी माेठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक उत्सवाला प्राधान्य देण्यात येत आहे. इकाे फ्रेंडली गणेशाची प्रतिष्ठापना करण्याकडे बच्चे कंपनीचा अधिक ओढा आहे. लातुरात गुलालाला फाटा देत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यंदा शासन-प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे गणेशभक्तांनी काटेकाेरपणे पालन केल्याचे दिसून आले. परिणामी, मिरवणुका, ढाेल-ताशांचा गजर फारसा दिसून आला नाही.
गणेशभक्तांमध्ये उत्साह...
श्रावण महिना उजाडला की गणेशभक्तांना श्री गणेशाची ओढ लागते. यंदाही या उत्सवावर काेराेनाचे संकट कायम आहे. अशा स्थितीत गणेशभक्तांनी काेराेनाच्या नियमांचे पालन करत श्री गणरायाचे उत्साहात स्वागत केले. शिवाय, आनंदाच्या वातावरणात घराेघरी श्रींची प्रतिष्ठापना केली. चेहऱ्याला मास्क लावून बच्चे कंपनी गणेशाची मूर्ती नेण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाले हाेते.
लहान मूर्तीला अधिक मागणी...
प्रशासनाच्यावतीने लातूर शहर आणि जिल्ह्यात माेजक्याच ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीला परवानगी देण्यात आली हाेती. यंदाही इकाे फ्रेंडली गणेशमूर्ती, छाेट्या आकारातील मूर्तीला अधिक मागणी होती. समांतर रस्त्यावर गणेशमूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांची सकाळपासूनच माेठी गर्दी हाेती. यंदा दाेन फुटापर्यंतच्या मूर्तीला माेठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे दिसून आले.
सजावटीच्या साहित्याची खरेदी...
लातूर शहर आणि जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा शहरातील बाजारपेठेत श्री गणेशाेत्सवासाठी सजावटीच्या साहित्यासह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची माेठ्या प्रमाणावर शुक्रवारी दिवसभर गर्दी हाेती. पूजेसाठी लागणारे हार, फुलांसह अन्य साहित्य खरेदीबराेबरच नवैद्य म्हणून माेदकांना भाविकांतून माेठी मागणी हाेती. परिणामी, शहरातील सर्वच ठिकाणच्या हाॅटेल्स, बेकरी, मिठाईच्या दुकानांवर गर्दी हाेती.