जळकोट येथील आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:35+5:302021-03-16T04:20:35+5:30
दर सोमवारी जळकोट येथे आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते आणि स्टेशनरी, कापड, किराणा विक्रेते पानवाले, लालमिरची ...

जळकोट येथील आठवडी बाजार बंद
दर सोमवारी जळकोट येथे आठवडी बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते आणि स्टेशनरी, कापड, किराणा विक्रेते पानवाले, लालमिरची विक्रेत्यांचा हिरमोड झाला, शिवाय येथील शेळी बाजारावरही परिणाम झाला तर अनेक व्यापारी आले नाहीत. आठवडी बाजार बंद असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ज्यांचे पोट हातावर आहे अशा विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली. जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजाराबरोबर सायंकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश तोंडारे यांनी बंदबाबत जनजागृती केली होती. प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत जळकोट येथील नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन केले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे, पुन्हा पुन्हा साबणाने हात धुवावेत, आपले हात नाकाला आणि तोंडाला लावून नये, काेराेनाबाबत जाहीर केलेल्या नियमाचे पालन करावे, राज्यमंत्री संजय बनसोडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण बनशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, जळकोट नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी भारत राठोड, आरोग्य विभागाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी केले आहे.