आठवडी बाजार भरला; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:19+5:302021-06-20T04:15:19+5:30
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत. मध्यंतरी गावागावांतील ...

आठवडी बाजार भरला; ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग !
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत. मध्यंतरी गावागावांतील आठवडी बाजारावर प्रतिबंध करण्यात आला होता. तो आता मागे घेण्यात आला असल्याने आठवडी बाजारासह शहरातील बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. मात्र, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात बेफिकीरपणा दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीत मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक विनामास्कच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातून कोरोनाला निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत स्थानिक प्रशासन उपाययोजना करीत असले तरी त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचारी बाजारात दाखल झाले की, मास्क लावले जातात. पुन्हा काढले जात असल्याचे दिसून येत आहे.
लातूर अनलॉक होताच बाजारात झाली गर्दी
लातूर जिल्हा अनलॉक होताच आठवडी बाजार पुन्हा सुरू झाले आहेत. बाजारात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. यातून बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजारात विक्रेते-ग्राहक विनामास्क
ग्रामीण भागासह शहरातील आठवडी बाजारात भाजीपाल्यासह इतर साहित्यांची विक्री, खरेदी होत असते. यासाठी ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रेते आणि ग्राहकच काही ठिकाणी विनामास्क असल्याचे दिसून आले.
सोशल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग गरजेचे
शहरातील भाजी मंडईसह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज आहे. त्यासाठी मार्किंग करणे महत्त्वाचे आहे. ते मार्किंग सध्या कुठेच दिसून येत नाही. विक्रेत्यांसह ग्राहकांनाही कोरोना नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाकडून कारवाईचा बडगा
लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी स्थानिक प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. काहींना जाग्यावरच दंड केला जात आहे. अनलॉक असले तरी नियमांचे पालन होण्याची खरी गरज आहे.
सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी बेजबाबदारपणे वागता येणार नाही. यासाठी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करीत काळजी घेण्याची गरज आहे. सातत्याने हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्कचा वापर कायम करणे हे महत्त्वाचे आहे. ज्या नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही, अशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. -