आम्ही आमचे जीवन, स्नेह, प्रेम एक-दुस-यासाठी समर्पित करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:39+5:302021-02-15T04:18:39+5:30
यावेळी औश्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे, सुनिताताई आरळीकर, डॉ. संध्या ...

आम्ही आमचे जीवन, स्नेह, प्रेम एक-दुस-यासाठी समर्पित करु
यावेळी औश्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे, सुनिताताई आरळीकर, डॉ. संध्या वारद, डॉ. संजय वारद, डॉ. पवन चांडक, कृष्णा महाडिक, डॉ. प्रीती कणिरे, डॉ. स्वप्नील कणिरे, राचोटी स्वामी, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जयश्रीताई खाडिलकर, डॉ. शैला बरुरे, डॉ. क्रांती मोरे, सेवालयाचे प्रमुख प्रा. रवि बापटले आदींची उपस्थिती होती.
या विवाह सोहळ्याची काही दिवसांपासून जय्यत तयारी सुुरु होती. शनिवारी हळदीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी उपस्थित राहून या वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यानिमित्ताने हॅप्पी इंडियन व्हिलेजचा परिसर सकाळपासून व-हाडी मंडळींनी गजबजून गेला होता. विवाह सोहळा पार पडताच हॅप्पी इंडियन व्हिलेजवरील युवकांनी ढोल-ताशांचा गजर करुन आनंदोत्सव साजरा केला.
कदापिही मनभेद होणार नाही...
हा विवाह सोहळा सत्यशोधकी पध्दतीने पार पडला. यावेळी पूजा- महेश, सोनी- अक्षय, अश्विनी - राजबा, नेहा- राजकुमार यांनी एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी राहण्याबरोबरच समाज परिवर्तनाच्या कार्यात आयुष्यभर साथ देईन. व्यक्तीगत, कौटुंबिक व सामाजिक जीवनात परस्पर सहकार्याने एकनिष्ठ राहीन. आमच्यात कदापिही कोणत्याही कारणावरुन मनभेद होणार नाही, अशी शपथ घेतली.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र...
विवाह सोहळा पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीचे तिथेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र नव वधू-वरांना देण्यात आले. प्रकल्पावर एकीकडे आनंद व्यक्त होत होता तर दुसरीकडे आपल्यासोबतची बहीण, भाऊ आता दूर जाणार म्हणून तेथील बालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.