आम्ही विश्व लेखिका संस्थेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:59+5:302021-04-21T04:19:59+5:30
या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग ...

आम्ही विश्व लेखिका संस्थेची स्थापना
या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील सदस्यांची मोट बांधून गुढीपाडव्यापासून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विश्व पातळीवर
उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प केला. यासाठी ठाणे येथील प्रा. पद्मा हुशिंग यांची अध्यक्षा म्हणून, तर नागपूर येथील प्रा. विजया मारोतकर यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून साहित्यिक डॉ. विजयाताई वाड, माधवी घारपुरे, वासंती वर्तक, प्रा. मेधा सोमण, शरयू शहा, भारती मेहता, नयना सहस्त्रबुद्धे, तर सचिव वृषाली राजे, ठाणे, सहसचिव मानसी जोशी, ठाणे, खजिनदार संगीता चव्हाण, खजिनदार अस्मिता चौधरी ठाणे, सदस्य मंजिरी कुलकर्णी, ॲड. सिमंतिनी नूलकर, अश्विनी निवर्गी, माधुरी चौधरी, देविका देशमुख, सुनेत्रा जोशी, विजया पंडितराव, मंदाकिनी क्षीरसागर, बालिका बरगळ, शुभांगी दळवी, उर्मिला पांगम, अर्चना नळगीरकर, प्रा. अश्विनी देशमुख, सुनंदा सरदार, उदगीर, कविता पुदाले, मंगल नागरे, नीशा डांगे, नीताताई बोबडे, जयश्री कोटगीरवार, ज्योती पुजारी, डॉ. वसुधा पांडे, मीना खोंड, स्वाती सुरंगळीकर, डॉ. अंजली टाकळीकर, भारतीताई भोरे, कविताताई कठाणे, डॉ. सुनंदा जुलमे यांनी ऑनलाईन हजेेेरी लावली. उदगीरात या चळवळीच्या माध्यमातून कथा, कविता वाचन व सांस्कृतिक उपक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात येत असल्याचे निवर्गी यांनी सांगितले. आभार अश्विनी निवर्गी यांनी मानले.