भातखेडा कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:23+5:302021-04-03T04:16:23+5:30
जिल्ह्यात कधी दुष्काळ कधी, कधी निसर्गाची शेतकऱ्याकडे पाठ असे चित्र आहे. यावर्षी पाऊस अनियमीत झाला आहे. लातूर तालुक्यांतील बोरवटी, ...

भातखेडा कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी सोडावे
जिल्ह्यात कधी दुष्काळ कधी, कधी निसर्गाची शेतकऱ्याकडे पाठ असे चित्र आहे. यावर्षी पाऊस अनियमीत झाला आहे. लातूर तालुक्यांतील बोरवटी, कासारगाव, भाडगाव आदी गावात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. त्यांना पिण्यासाठी मांजरा नदीत पाणी रहायचे मात्र सध्या भातखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यांत पाणी नसल्याने पशुधनाची गैरयोय होत आहे. याकरीता शासनाने मांजरा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी महापूर व भातखेडा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी व पशूपालकांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे केली आहे. निवेदनावर शांताबाई मुळे, शिवाजी बनसोडे, गणेश नाथजोगी, उमेश बेद्रे, विकास बेद्रे, आजम शेख, संतोष भोसले, विश्वांभर मुळे, पंडित ढमाले, रामचंद्र पाटील, संजय आचवले, ॲड. सुशांत मुळे आदींसह विविध गावाचे सरपंच, उपसरपंच यांच्या स्वाक्ष-या आहेत. यावेळी संजय गांधी निराधार कमिटीचे चेअरमन प्रविण पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ शिंदे यांची उपस्थित होती.