शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अहमदपूरात पाण्याचे दुर्भिक्ष; ४९ गावे-वाड्या व्याकूळ, एकाच गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By हरी मोकाशे | Updated: January 24, 2024 17:36 IST

पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

लातूर : जिल्ह्यास महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत असून आता झळा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. त्यामुळे टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपर्यंतही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरीपातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. तसेच नाले, ओढे खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरीसपासून जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.

अहमदपुरात सर्वाधिक पाण्याची समस्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ६औसा - ८निलंगा - ४रेणापूर - ३अहमदपूर -२५शिरुर अनं. - १उदगीर - १जळकोट - १एकूण - ४९

मंजुरीसाठी तहसील कार्यालयास २६ प्रस्ताव...जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५७ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पाहणीअंती ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले. दरम्यान, १७ गावे आणि ८ वाड्यांचे २६ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिग्रहण...गतवर्षी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मार्चमध्ये निर्माण झाली होती. जिल्ह्यात मार्चपासून अधिग्रहणास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जानेवारीअखेरीपासून अधिग्रहणास सुरुवात झाली आहे. यंदाचे पहिले अधिग्रहण उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा गावासाठी करण्यात आले आहे.

दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावास तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समिती आणि तहसीलदारांकडून पाहणी होईल. एक किमीच्या परिघात अधिग्रहणाची सोय नसल्यास टँकर सुरु होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा...प्रकल्प - उपयुक्त साठातावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १५.३५तिरु - ००देवर्जन - २४.५२साकोळ - ३४.८०घरणी - २३.६२मसलगा - ४३.२८एकूण - १७.०१

तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच १३४ साठवण तलावात ५७.४४१ दलघमी म्हणजे १८.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर