- बालाजी थेटेऔराद शहाजानी (लातूर): गावकऱ्यांच्या श्रमदानातून जलयुक्त शिवारचे चांगले काम झालेल्या निलंगा तालुक्यातील हलगरा हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले. मात्र टंचाईच्या झळांनी घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना तासन् तास कसरत करावी लागत आहे.हलगरा या गावात तेरणा नदीवरून कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना सात वर्षांपासून बंद आहे. सद्यस्थितीत गावात ३६ मिनी वॉटर योजना सुरू केल्या, पण त्यापैकी केवळ केवळ दोन मिनी टाक्या सुरू आहेत. २१ विंधन विहिरीपैकी एक चालू असून २० बंद पडल्या आहेत. ११ हातपंप बंद असून आठ जुने पुरातन काळातील बांधकाम केलेले आड बंदच आहेत. पाण्याचे सर्वच स्रोत बंद पडल्याने एका टँकरद्वारे तीन आडामध्ये तीन दिवसाला एकदा पाणी सोडले जाते.जानेवारीत चार बोअर, विहीर अधिग्रहण व एका टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली होती. त्यातील दोन अधिग्रहणाचे स्रोत आटले असून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. आणखी एका टँकरची व अधिग्रहणाची मागणी करण्यात आल्याचे उपसरपंच अमृत बसुदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात पाण्याची चणचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 01:29 IST