शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

जलस्त्रोत आटले; लातूर जिल्ह्यातील सव्वातीनशे गावे तहानली!

By हरी मोकाशे | Updated: April 8, 2024 17:58 IST

टंचाईची दाहकता वाढली : दीडशे गावांना अधिग्रहणाचे पाणी

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्याचबरोबर विहिरी, कुपनलिका आटू लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची दाहकता अधिक वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२२ गावे तहानली असून ४३६ अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी १५२ गावांना १७० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. शिवाय, परतीचाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम प्रकल्पांसह विहिरीच्या पाणी पातळीत पुरेशा प्रमाणात वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवणार असे गृहित धरीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनात्मक आराखडे तयार करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या उन्हाबरोबर बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे.

अहमदपुरातील ७९ गावांत टंचाई...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३८औसा - ४६निलंगा - ७३रेणापूर - ३०अहमदपूर - ७९चाकूर - १९शिरुर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - ०१जळकोट - ११एकूण - ३२२

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक अधिग्रहणे...जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४३६ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करुन १९ गावांचे ३८ प्रस्ताव वगळले आहेत. २४१ गावांचे २९३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२४ गावे आणि २८ वाड्यांचे असे एकूण १५२ गावांचे १७० अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली...जिल्ह्यातील १९ गावे आणि एक वाडीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी १२ गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करण्यात आले असता त्यातील ९ गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर...औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. तालुक्यातील लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णीसही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फुलसेवाडीस टँकर मंजूर करण्यात आले आहे. जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारे तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी या गावांना टँकरची प्रतीक्षा लागून आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर