शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

'वाँटेड' गुन्हेगाराला पकडण्यासाठी लग्नमंडपात आलेल्या पोलिसांवर वऱ्हाडींचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:14 IST

वाँटेड आरोपी भावाच्या लग्नात आल्याच्या माहितीवरून पोलीस लग्नात आले

ठळक मुद्देमारहाण करणारे सहाजण ताब्यात जखमीवर शासकीय रूग्णालयात उपचार

लातूर : गेल्या काही दिवसांपासून वाँटेड असलेला आरोपी पकडण्यासाठी शहरातील बुऱ्हाण नगर भागात एका विवाह समारंभात गेलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना वऱ्हाडातील नागरिकांनी जबर मारहाण केल्याची घटना दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली़ याप्रकरणी सहा जणांना विवेकानंद चौक पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींची धरपकड सुरू केली आहे़ 

सूत्रांनी सांगितले, लातूर शहरातील बुऱ्हाण नगर भागात वाँटेड असलेल्या आरोपीच्या भावाचे लग्न होते़ याठिकाणी आरोपी येणार असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लागली होती़ त्यामुळे स्थागुशाचे प्रकाश भोसले, युसूफ शेख, रामहरी भोसले व अन्य एक कर्मचारी लग्न समारंभात गेले होते़ विवाह लागल्यावर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता वऱ्हाडी मंडळीतील काहींनी पोलिसांना मारहाण सुरू केली़ जमावाकडून मारहाण सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी सुटका करून दिली़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांच्यासह विवेकानंद चौक, गांधी चौक पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले़ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील ४ ते ५ जणांना ताब्यात घेतले असून लोकांचा शोध पोलीस घेत आहेत़

दोघांवर उपचाऱ सुरु मारहाण झालेले पोलीस कर्मचारी प्रकाश भोसले, युसूफ शेख या दोघांवर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़

पक्षीमित्र धावले मदतीलाविवाह समारंभस्थळी पोलिसांना मारहाण होत असल्याचे पाहून पक्षीमित्र महेबूबचाचा मदतीला धावले़ त्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत पोलिसांना बाजूला आणले़ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना माहिती दिल्यावर तात्काळ पोलीसही घटनास्थळी पोहचले़

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस