बोधन-जळकोट- लातूर रोड रेल्वेमार्गाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:21+5:302020-12-31T04:20:21+5:30
सदरचा लाेहमार्ग अस्तित्वात यावा, यासाठी जनतेने अनेक प्रकारे आंदाेलन, माेर्चे, धरणे आणि निवेदन देत पाठपुरावा केला आहे. याला लाेकप्रतिनिधींची ...

बोधन-जळकोट- लातूर रोड रेल्वेमार्गाची प्रतीक्षा !
सदरचा लाेहमार्ग अस्तित्वात यावा, यासाठी जनतेने अनेक प्रकारे आंदाेलन, माेर्चे, धरणे आणि निवेदन देत पाठपुरावा केला आहे. याला लाेकप्रतिनिधींची याेग्य ती साथ न मिळाल्याने हा रेल्वेमार्ग अद्यापही प्रलंबित आहे, असा आराेप जनतेतून केला जात आहे. आता नव्या वर्षात तरी या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळेल का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जळकोटसह बिलोली, मुखेड, चाकूर तालुक्यातील नागरिकांसाठी बोधन - जळकोट - लातूर रोड हा प्रस्तावित रेल्वेमार्गाचा लाभ हाेणार आहे. यातून या तालुक्यातील गावांचा, परिसराचा कायापालट होणार आहे. शिवाय, व्यापारासह दळणवळणाला गती मिळणार आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला यातून माेठा राेजगार उपलब्ध हाेणार आहे. हा परिसर रेल्वेमार्गाशी जोडला तर देशभरातील दळण-वळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
लाेकप्रतिनिधींची उदासीनता...
बाेधन-जळकाेट-लातूर राेड या प्रस्तावित असलेल्या रेल्वेमार्गाबाबत लाेकप्रतिनिधीच उदासीन असल्याचे दिसून येते. या रेल्वे मार्गासाठी जनतेनेच सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, सामान्य जनतेचा आवाज सरकारदरबारी पाेहोचत नसल्याने तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. परिणामी, हा मार्ग प्रलंबित आहे. दिल्ली, मुंबईतील सरकारला या तालुक्यांचे प्रश्न कसे कळणार? त्यासाठी लोकप्रतिनिधींनी ते सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. तरच विकासाचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, याबाबतीतच लाेकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते.
खासदार, राज्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा...
बहुप्रतिक्षित असलेल्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली असून, त्याचे प्रत्यक्ष काम सुरू हाेण्यासाठी लातूरचे खा. सुधाकर शृंगारे यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. रेल्वे मंत्रालयासह लोकसभेत याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी जनतेची आहे. तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.