* कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या उपचारांत खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:02+5:302021-05-08T04:20:02+5:30
खाजगी रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोराेनाबाधितांवर उपचार सुरू असल्याने ग्रामीण भागातील शुगर (मधुमेह) व बीपीचा (रक्तदाब) त्रास असणाऱ्या तसेच ...

* कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या उपचारांत खंड
खाजगी रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोराेनाबाधितांवर उपचार सुरू असल्याने ग्रामीण भागातील शुगर (मधुमेह) व बीपीचा (रक्तदाब) त्रास असणाऱ्या तसेच इतर आजारांच्या अनेक रुग्णांच्या नियमित तपासणी आणि उपचारांतही खंड पडला आहे.
रुग्णालयात गेलो तर आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या भीतीपोटी ग्रासलेले ग्रामीण भागातील असंख्य रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही घाबरत आहेत.
एरव्ही, नियमित तपासणीला जात असले, तरी सध्या कोरोनाच्या भीतीने ते घरीच पडून राहतात. चापोलीसह परिसरात अशीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीला सर्वात जास्त रुग्ण हे शुगर, बीपी व इतर आजारांचे आहेत. बहुतांश ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हे आजार सर्रास आहेत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शुगर, बीपीने ग्रस्त रुग्ण तालुका तथा जिल्हास्तरीय रुग्णालयांत जाऊन नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होते. मात्र, आता कोरोनाच्या भीतीमुळे लोक रुग्णालयात जाण्यासाठीच घाबरत आहेत.
रुग्णालयात जायचे कशाने...
रुग्णालयात गेल्यावर डॉक्टर कोरोनाची टेस्ट करायला लावतात. रुग्णाला हातही लावत नाही,अशी भीती आणि गैरसमज अनेकांमध्ये आहे. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णाला रुग्णालयात जायला साधन नाही. त्यामुळे रुग्णालयात जायचे तरी कशाने, हाही प्रश्न अनेकांसमोर आहे.
रुग्णांमध्ये गैरसमजच जास्त...
कोविडची लक्षणे असलेले अनेक जण खासगी
रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शुगर, बीपीचा त्रास असलेले व अन्य आजारांचे रुग्ण दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण आहेत म्हणून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही जायला घाबरत आहेत. - डॉ. धनंजय सावंत, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र चापोली