भेंडीचा भाव करण्यावरून दाेघांकडून जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:08+5:302021-09-12T04:24:08+5:30
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शेख रियाज अहमद (२८, रा. किल्ला गल्ली, उदगीर) हे शहरातील पत्तेवार चाैकात असलेल्या भाजी मंडईमध्ये शुक्रवारी ...

भेंडीचा भाव करण्यावरून दाेघांकडून जबर मारहाण
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी शेख रियाज अहमद (२८, रा. किल्ला गल्ली, उदगीर) हे शहरातील पत्तेवार चाैकात असलेल्या भाजी मंडईमध्ये शुक्रवारी भाजीपाला खरेदीसाठी गेले हाेते. त्यांनी एका हातगाडेवाल्याकडे भेंडी कशी दिली असे विचारले असता, त्याने दहा रुपये अर्धा किलाे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी दुसऱ्या हातगाड्यावर भेंडी विचारण्यासाठी गेला असता, पहिल्या हातगाडेवाल्याने त्याला १५ रुपये पाव किलाे अशी भेंडी दे..असे म्हणाला. यावेळी फिर्यादीने तुला काय करायचे आहे असे म्हणून जाब विचारला असता, नाजीन बागवान याच्यासह अन्य एकाने संगनमत करून फिर्यादीला वजन करण्याच्या लाेखंडी बाटाने डाेळ्याच्या बाजूला, कानावर, डाव्या कानावर, डाेक्याला, मानेवर, पाठीत आणि इतर ठिकाणी मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी उदगीर शहरातील भाजी मंडईत घडली.
याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रावरीवरून नाजीन बागवान याच्यासह अन्य एकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस नाईक गायकवाड करीत आहेत.