संचारबंदी आदेशाचे उल्लंघन; शहरात २१ जणांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:18+5:302021-03-05T04:20:18+5:30
लातूर : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मनपा व नगरपालिका ...

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन; शहरात २१ जणांविरुद्ध कारवाई
लातूर : जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मनपा व नगरपालिका क्षेत्रांत संचारबंदी लागू केली आहे. या काळात बाहेर पडण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुरुवारी लातूर शहरात २१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ व विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ अशा २१ जणांवर भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मागच्या शनिवार, रविवार जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर आता रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी या वेळेत घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवांना या कालावधीमध्ये निर्बंध आहेत.