तांदुळज्याच्या सरपंचपदी विनिता बावणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:45+5:302021-02-06T04:34:45+5:30
तांदुळजा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे जगदीश बावणे यांच्या पॅनलचे ६ तर भाजपाचे महादेव गायकवाड, श्यामसुंदर वाघमारे यांच्या पॅनलचे ५ उमेदवार ...

तांदुळज्याच्या सरपंचपदी विनिता बावणे
तांदुळजा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे जगदीश बावणे यांच्या पॅनलचे ६ तर भाजपाचे महादेव गायकवाड, श्यामसुंदर वाघमारे यांच्या पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला होते. त्यामुळे गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी जोरदार चुरस सुरु होती. अध्यासी अधिकारी एम.बी. पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्यात आली. यात जगदीशराव बावणे यांच्या पॅनलकडून सरपंच पदासाठी विनिता शिवाजी बावणे यांनी तर त्यांच्या विरोधात सविता विजय जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. यात विनिता बावणे यांना ६ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
उपसरपंचपदासाठी बावणे यांच्या पॅनलकडून अंकुश गणगे यांनी तर त्यांच्या विरोधात बक्तावर जिलानी बागवान यांनी अर्ज दाखल केला. यावेळी मतदान घेण्यात आले. त्यात गणगे यांना ६ मते पडल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाली.
अध्यासी अधिकारी पाटील यांना ग्रामविकास अधिकारी उध्दवराव डोंगरे, तलाठी मल्लिकार्जुन माशाळे यांनी सहाय्य केले. या नूतन पदाधिका-यांचे स्वागत पॅनल प्रमुख जगदीशराव बावणे, सिद्रामप्पा गायकवाड, वलायतखाॅ पठाण, श्रीमंत गायकवाड, जनक गायकवाड, विनोद वाघचौरे आदींनी केले.