हॉटस्पॉट बनलेले एकुरगा गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:00+5:302021-05-08T04:20:00+5:30
एकमेकांपासून दूर राहणे, गावात कोणी कोणाच्या घरात जायचे नाही व आरोग्य खात्याने केलेले उपचार यामुळे एकूण २८० जणांची कोरोना ...

हॉटस्पॉट बनलेले एकुरगा गाव कोरोनामुक्त
एकमेकांपासून दूर राहणे, गावात कोणी कोणाच्या घरात जायचे नाही व आरोग्य खात्याने केलेले उपचार यामुळे एकूण २८० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर हे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी दिली. या गावात उदगीर व इतर ठिकाणाहून ये-जा केल्यामुळे तसेच गावात होळी - रंगपंचमी साजरी केल्याने, टिपरे खेळल्यामुळे व दोन लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या गावाला कोरोनाचा रंग चढला होता. होळीचा रंग कोरोनात रूपांतर झाल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात परवड झाली होती. अख्ख्या गावामध्ये दहशत निर्माण झाली होती. आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन यांनी गाव सील केले होते. आरोग्य खात्याचे कर्मचारी तळ ठोकून बसले व लोकांवर उपचार केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आरोग्य उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले, डॉक्टर गंगाधर परगे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, डॉ. संजय पवार यांनी या गावात करडी नजर ठेवून गावातून विविध उपाययोजना व सूचना केल्यामुळे हे गाव आता कोरोनामुक्त झाले आहे. ८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.