विलासराव म्हणजे प्रगल्भ जाणीव अन् आत्मविश्वास असलेले नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:27+5:302021-02-17T04:25:27+5:30
अध्यक्षस्थानी स्वारातीम मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भोसले होते. यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, स्वत:विषयी प्रगल्भ जाणीव असलेल्या विलासरावांच्या जवळ प्रचंड ...

विलासराव म्हणजे प्रगल्भ जाणीव अन् आत्मविश्वास असलेले नेतृत्व
अध्यक्षस्थानी स्वारातीम मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भोसले होते. यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, स्वत:विषयी प्रगल्भ जाणीव असलेल्या विलासरावांच्या जवळ प्रचंड आत्मविश्वास होता. त्यांना स्वत:च्या सामर्थ्य अन् मर्यादांची जाणीव होती. लक्ष्मणरेषेच्या पलिकडे जावे की जाऊ नये, याचे आत्मभान होते. ते विचारमंचावर उभे राहिले की, श्रोते टाळ्या वाजवत इतकी त्यांची लोकप्रियता होती. उभे राहण्याची त्यांची पद्धत, जेव्हा ते बोलत असत तेव्हा पहिल्या पाच मिनिटांत सारे सभागृह टाळ्या अन् हास्यामुळे फुलून गेले. श्रोत्यांसोबत त्यांचा संवाद होता. त्यांची पद्धत सर्वांना जमेल असे नाही. पण जे अशक्य वाटते, ते शक्य करून दाखविण्याचे कौशल्य त्यांच्या वाणीत, डोळ्यांत अन् हास्यात होते. कोणावर टीका वा स्तुती करणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांच्या टीकेचे प्रहार कुणाचा अवमान करणारे नव्हते. टीका व्यक्तिगत नव्हती. सेवाभावनेने राजकारण कसे करावे हा आदर्श विलासरावांनी निर्माण केला आहे. त्यांना एकदा विचारले की, काँग्रेसचा जाहीरनामा काय आहे. त्यावेळी ते म्हणाले, माझे भाषण म्हणजेच काँग्रेसचा जाहीरनामा असतो. मी बोलतो तोच जाहीरनामा, इतक्या आत्मविश्वासाने ते बोलत असत, असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.
प्राचार्य डॉ. अजय पाटील, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, प्रा. दादासाहेब लोंढे यांची उपस्थिती होती.