विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:08+5:302021-02-05T06:24:08+5:30
राजमाता संस्थेतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान लातूर : शहरातील राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कोरोना योद्धा पुरस्कार ...

विजयी ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
राजमाता संस्थेतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान
लातूर : शहरातील राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कोरोना योद्धा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी बालाजी जाधव, विशाल देवकते, राम शिंदे, विवेश शिंदे, श्रीकांत फोलाने, वित्त व लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, डॉ. संतोषकुमार डोपे, सपनाताई किसवे, सुरेशभाऊ कांबळे, बालाजी सुळ, संध्याताई जैन, ॲड.प्रमोद जाधव, दिपाली गित्ते, डॉ. कांचनताई जाधव, डॉ.शिल्पाताई शिंदे यांची उपस्थिती होती.
कातपूर आणि शिवणी येथे कार्यक्रमलातूर : केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भारतात स्वच्छता प्रसाराशाठी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने कातपूर आणि शिवणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मनोजकुमार रायवाड, श्रीराम वाघमारे, लालासाहेब देशमुख, समन्वयक प्रशांत जाधव, भास्कर देशमुख, बाळकृष्ण देशमुख, आबासाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख, बबन भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दयानंद महाविद्यालयात मतदार दिवस साजरा
लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके हे होते. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, क्रीडाप्रमुख डॉ. नितेश स्वामी, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. गणेश लहाने, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे प्रा.विठ्ठल जाधव, कार्यालयीन अधीक्षक कातपुरे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
एनएसयुआयच्या मोफत अभ्यासिकेची पाहणी
लातूर : एनएसयुआयच्या वतीने शहर सुरू करण्यात आलेल्या मोफत अभ्यासिकेची पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे, अय्युब मणियार, दत्ता सोमवंशी, सूर्यकांत कातले, ॲड.शरद जाधव, नागसेन कामेगावकर,रत्नदीप अजनिकर, मोहन सुरवसे,डॉ. सतीश यादव, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, प्रवीण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
संजय कोडगे यांचा लातूरात सत्कार
लातूर : भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांचा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुर्यकांतराव शेळके, निळकंठराव पवार, मनिष बंडेवार, सुभाषअप्पा सुलगुडले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.