व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स
By Admin | Updated: April 30, 2016 13:08 IST2016-04-30T12:12:33+5:302016-04-30T13:08:02+5:30
लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आपलं म्हणण ऐकून घ्यावं यासाठी आंदोलनकर्त्यांनी चक्क नागीन डान्स केला

व्हिडिओ - आंदोलनकर्त्यांचा अधिका-यांसमोर 'नागीन' डान्स
ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 30 - आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आंदोलन करताना उपोषणाला बसणे, घोषणा देणे या गोष्टी नेहमीच्याच. मात्र लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी आपलं म्हणण ऐकून घ्यावं यासाठी आंदोलनकर्त्यांनी चक्क नागीन डान्स केला.
या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्ते कार्यालयात येऊन चर्चा करतात आणि त्यानंतर 'नागीन डान्स' करुन आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याची डागडुजी करण्यासाठी सांगूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी हा अजब फंडा वापरत आपला निषेध नोंदवला.