लोकसहभागातून स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:47+5:302021-05-22T04:18:47+5:30
यावेळी ॲड. संजय पांडे, डाॅ. अशोक आदवाड, डाॅ. अजय जाधव, स्थायी समिती सभापती ॲड. दीपक मठपती, डाॅ. राजेश दरडे, ...

लोकसहभागातून स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास सुरुवात
यावेळी ॲड. संजय पांडे, डाॅ. अशोक आदवाड, डाॅ. अजय जाधव, स्थायी समिती सभापती ॲड. दीपक मठपती, डाॅ. राजेश दरडे, डाॅ. अजय पुनपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लातूरमध्ये ऑक्सिजन निर्मिती करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्पंदनच्या वतीने लोकसहभागातून एका दिवसाला १०० सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. त्यासाठी श्री जानाई प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी आयटीआयने नि:शुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे. पद्मभूषण डाॅ. अशोक कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च १ं.५ कोटी आहे. प्रकल्प उभारणीसाठी निधीची आवश्यकता आहे. सामाजिक बांधीलकी जपत लातूरकरांनी या प्रकल्पास मदत करावी, असे आवाहन डाॅ. विश्वास कुलकर्णी, अतुल ठोंबरे, श्रीकांत हिरेमठ, शिरीष कुलकर्णी यांनी केले आहे.
यावेळी संजय अयाचित, महेश औरादे, भूषण दाते, रवी मार्कंडेय, सुधाकर जोशी, अभिजित कवठाळकर, आर्किटेक्ट विजय सहदेव, डाॅ. वैशाली टेकाळे, डाॅ. अनुजा कुलकर्णी, ॲड. प्रसाद पांडे, सीए अग्रवाल, आदी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी अर्थवर्धिनी जानाई महिला सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक लाखाच्या निधीचा धनादेश डाॅ. अनुजा कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आला. यावेळी गीता ठोंबरे, डाॅ. माया कुलकर्णी, संपदा दाते, रेखा मार्कंडेय, रोहिणी मुंढे, स्मिता अयाचित, नीलिमा अंधोरीकर, अंजली कुलकर्णी, अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या.