पाच नंबर चौकात वाहन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:32+5:302021-04-07T04:20:32+5:30
कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येईना लातूर- शहरातील विविध भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने अनेक नागरिक रिकाम्या जागेत कचरा टाकत ...

पाच नंबर चौकात वाहन तपासणी
कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येईना
लातूर- शहरातील विविध भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने अनेक नागरिक रिकाम्या जागेत कचरा टाकत आहेत. खाडगाव स्मशानभूमी परिसरात कचऱ्याचे ढीग पडले आहेत. महापालिका प्रशासनाने या भागातील कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रिंगरोडवर रिकाम्या जागेत पडलेल्या कचऱ्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
वसवाडी भागात पाण्यासाठी भटकंती
लातूर- शहरातील बार्शी रोडवरील पाखरसांगवी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वसवाडी भागात जलवाहिनीची सोय नसल्याने या भागातील हजारो नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मुख्य रस्त्याने गेली असून याठिकाणच्या लिकेजचा येथील नागरिकांना आधार मिळत आहे. सध्या उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने उन्हातच लहान, थोर मंडळी पाण्यासाठी चकरा मारत असल्याचे चित्र पहायवास मिळत आहे.