कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत भाजीपाला मार्केट हलवू नये; मनपा आयुक्तांकडे शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:40+5:302021-07-17T04:16:40+5:30
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तिसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात होईल, असेही भाकीत करण्यात येत आहे. त्यामुळे ...

कोरोनाचा संसर्ग असेपर्यंत भाजीपाला मार्केट हलवू नये; मनपा आयुक्तांकडे शेतकरी संघटनेची मागणी
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तिसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात होईल, असेही भाकीत करण्यात येत आहे. त्यामुळे गावाच्या बाहेर असलेल्या नवीन गूळ मार्केट परिसरात भरविण्यात येणारा भाजीपाला बाजार हलविण्यात येऊ नये. जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत भाजीपाला बाजार गूळ मार्केट परिसरातच भरविण्यात यावा,असे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शेतकरी संघटनेने म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विमलताई आकनगिरे, शेतकरी दगडू साहेब पडिले यांची नावे आहेत.
मार्केट यार्डात खत, बी-बियाणे, कृषी औषधांचे मार्केट आहे. त्यामुळे पुन्हा तेथे भाजी मार्केट जुन्या ठिकाणी भरवले तर लोकांची गर्दी होईल. ही गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला मार्केट नवीन गूळ मार्केट परिसरातच ठेवावे. इतरत्र हलवू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे.