लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:33+5:302021-08-29T04:21:33+5:30
सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात अनंत प्रतिष्ठान, ...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात अनंत प्रतिष्ठान, अंबरखाने ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात आले. उद्घाटन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, प्रा. श्याम डावळे, ज्ञानेश्वर पाटील दावणगावकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, सरपंच विजयकुमार आंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले, माजी सरपंच अनंतराव भोसले, तलाठी कुलदीप गायकवाड, डॉ. मनोहर सूर्यवंशी, बी.एम. शेटकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गजाई, हरिश्चंद्र पाटील, पोहेकाॅ. एस.बी. मुरुडकर, ज्ञानेश्वर भांगे आदी उपस्थित होते.
शिबिरात १४ जणांनी रक्तदान केले. ८० रुग्णांची कान-नाक-घसा तपासणी करण्यात आली. शंभर नागरिकांनी कोविड लस घेतली. यावेळी अनंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, अमजदखान पठाण, विकी भोसले, अंकुश आनलदास, मोहन दापके, माणिक कांबळे, सुनील कांबळे, अक्षय भोसले, सुभाष हंगरगे, किरण कवडे, डॉ. रमेश पेंढारकर, डॉ. विशाल भोसले, पोलीस कर्मचारी तुकाराम बळदे, गोरख कसबे, दयानंद सोनकांबळे, सुनील माचेवाड, कपिल कांबळे, अमोल क्षीरसागर, मनोज गुडेवार, शंकर तेलंग, शाहरुख चौधरी, बसवेश्वर भुरे, अतिश गायकवाड, नरेश गायकवाड आदी उपस्थित होते.