गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:52+5:302021-01-04T04:17:52+5:30
उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण लातूर : लातूर विभागीय मंडळांतर्गत उच्च माध्यमिक परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण सोमवारी सकाळी ११ ते ...

गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम
उच्च माध्यमिक प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण
लातूर : लातूर विभागीय मंडळांतर्गत उच्च माध्यमिक परीक्षेच्या प्रमाणपत्रांचे वितरण सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्ह्याच्या वितरण केंद्रावर करण्यात येणार आहे. नांदेड येथे पीपल्स हायस्कूल, गोकुळनगर येथे, तर उस्मानाबाद जिल्ह्यात श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आणि लातूर येथे विभागीय मंडळ, विभागीय सचिव कार्यालयात होईल. संबंधितांनी प्रमाणपत्रे प्रस्तुत वेळेत उपलब्ध करून घ्यावीत, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज
लातूर : जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबरपासून सुरू केले आहे. १० जानेवारीपर्यंत सदर पोर्टल सुरू राहणार आहे. त्यामुळे प्राचार्य, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्मार्ट योजनेत जिल्हा अव्वल
लातूर : राज्य शासनाने २०२०-२१ मध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्रामीण परिवर्तन योजना राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला गट यांना लाभ होणार आहे. आतापर्यंत ७५४ प्रस्ताव सादर झाले आहेत. लातूर जिल्ह्याने नोंदणीमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आर.एस. पाटील, बी.पी. किरवले यांनी प्रयत्न केले.
मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी योजना
लातूर : मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेती अर्थसाह्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज पोर्टलवर ११ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. या तारखेत प्राप्त अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. संबंधित शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी सभापती गोविंद चिलकुरे, कृषी विकास अधिकारी एस.आर. चोले यांनी केले.
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
लातूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजी दिवसभर शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.