औसा येथे विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:17+5:302021-02-05T06:23:17+5:30
औसा : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येथील तहसील कार्यालयाने मतदार साक्षरता क्लबमार्फत मतदार जनजागृती केली. तसेच निवडणूक व लोकशाही ...

औसा येथे विविध उपक्रम
औसा : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त येथील तहसील कार्यालयाने मतदार साक्षरता क्लबमार्फत मतदार जनजागृती केली. तसेच निवडणूक व लोकशाही या विषयांवर वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत औशातील अजिम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, याकतपूर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, औसा येथील वीरभद्रेश्वर विद्यालय, आलमला येथील रामनाथ विद्यालय, औसा येथील मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अपचुंदा येथील सिद्धाजी विद्यालय आदी शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार शोभा पुजारी यांनी सत्कार केला. मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष काम करणारे महादेव खिचडे, जिल्हा परिषद सहशिक्षक कमलाकर सावंत, मुक्तेश्वर पडसलगे, भीमाशंकर वाडेकर, मतदार नोंदणी संदर्भात उत्कृष्ट काम करणाऱ्या बीएलओंना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शिवाजी कदम, वृषाली केसकर व निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.