सरकारी १२ रुग्णालयांत मोफत दिली जाणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:43+5:302021-03-01T04:22:43+5:30
लातूर : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असून, ...

सरकारी १२ रुग्णालयांत मोफत दिली जाणार लस
लातूर : कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असून, आता दुसरा टप्पा ६० वर्षे व त्यापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. इतर आजार असलेले ४५ ते ५९ वयोगटांतील नागरिक लस घेऊ शकणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १२ सरकारी आणि १३ खाजगी रुग्णालयांत लस दिली जाईल. सरकारी रुग्णालयात मोफत तर खाजगी रुग्णालयांत २५० रुपयांचे शुल्क असेल.
लसीकरणासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. कोविन २.० तसेच आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी करावी लागेल. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे. १ मार्चपासून प्रारंभ होत आहे.
कोविन, आरोग्यसेतूवर नोंदणी
६० व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगट असलेल्या व्यक्तींना कोविन किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी करता येणार आहे. ॲपवर गेल्यावर ओटीपी पाठवून मोबाइलचे व्हेरिफिकेशन होईल. फोटो आयडीनुसार नोंदणी होईल. स्त्री, पुरुष, पत्ता, बर्थ ऑफ ईअरची पडताळणी ॲपवरच होईल. ६० वर्षे व त्यापुढील वयाची खात्री आयडी प्रूफवरून होईल. त्याच पद्धतीने ४५ ते ५९ पर्यंत इतर आजार असलेल्या नागरिकांची नोंदणी करता येणार आहे. इतर आजार असल्याचे सर्टिफिकेट डाॅक्टरांकडून घ्यावे लागेल. हे सर्टिफिकेट व्हॅक्सिन केंद्रात दिल्यानंतर लस देण्याचा निर्णय होईल.
खाजगी रुग्णालये
१) यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर
२) देशपांडे हाॅस्पिटल, टिळकनगर, लातूर
३) लातूर कॅन्सर हाॅस्पिटल, नंदी स्टाॅप, लातूर
४) विवेकानंद हाॅस्पिटल, लातूर
५) अल्फा सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल, लातूर
६) आयकाॅन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल, लातूर
७) इंदुमती हाॅस्पिटल, देगलूर रोड, उदगीर
८) अश्विनी मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल, लातूर
९) गायत्री हाॅस्पिटल, बार्शी रोड, लातूर
१०) सदासुख हाॅस्पिटल, मुख्य रस्ता, लातूर
११) कृष्णा हाॅस्पिटल, लातूर
१२) येलाले हाॅस्पिटल, लातूर
१३) लाइफ केअर हाॅस्पिटल, उदगीर
सरकारी रुग्णालये
१) विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर
२) मुरूड ग्रामीण रुग्णालय
३) बाभळगाव ग्रामीण रुग्णालय
४) औसा ग्रामीण रुग्णालय
५) निलंगा उपजिल्हा रुग्णालय
६) उदगीर उपजिल्हा रुग्णालय
७) अहमदपूर ग्रामीण रुग्णालय
८) चाकूर ग्रामीण रुग्णालय
९) रेणापूर ग्रामीण रुग्णालय
१०) देवणी ग्रामीण रुग्णालय
११) जळकोट ग्रामीण रुग्णालय
१२) शिरूर अनंतपाळ प्रा. आरोग्य केंद्र