वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST2021-04-06T04:19:04+5:302021-04-06T04:19:04+5:30
सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २३ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी दोघांचा अहवाल काेराेना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ...

वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २३ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी दोघांचा अहवाल काेराेना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायकाचा समावेश आहे. चार दिवसांपूर्वीच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहायक पॉझिटिव्ह आल्याने ते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र असून, दवण हिप्परगा येथील उपकेंद्रावर लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. वडमुरंबी, धनेगाव, जवळगा, कवठाळा, चवन हिप्परगा, तळेगाव, वलांडी येथील उपकेंद्रावरही लवकरच लसीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप गुरमे म्हणाले. गावातील प्रत्येक नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वलांडीत दररोज लसीकरण केले जात असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच राणीताई भंडारी यांनी केली आहे.