तळेगावच्या उपकेंद्रात लसीकरण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:36+5:302021-04-09T04:20:36+5:30
: देवणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, तळेगाव (भो) ...

तळेगावच्या उपकेंद्रात लसीकरण सुरु
: देवणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान, तळेगाव (भो) येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरणास सुरुवात झाली. उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यावेळी सरपंच सदाशिव पाटील, ग्रामसेवक एस.आर. गोरे, भागवत इंगोले, अंकुश येणके, रामदास निडवंचे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात २० जणांना लस देण्यात आली. या केंद्रास गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी समुदाय अरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोदिनी गुंडरे, एस.एस. सूर्यवंशी, एस.सी. मुजावार, व्ही.जी. सुरवसे, एस.पी. शिंदे, बी.एम. पाटील, आर.बी. सुरवसे, बालिका माचे यांची उपस्थिती होती.