रामलिंग मुदगड येथे लसीकरणाची सोय करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:20 IST2021-04-21T04:20:25+5:302021-04-21T04:20:25+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रामलिंग मुदगड येथेही कोरोना बाधित आढळून येत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर ...

रामलिंग मुदगड येथे लसीकरणाची सोय करावी
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रामलिंग मुदगड येथेही कोरोना बाधित आढळून येत आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. रामलिंग मुदगड येथे ४५ वर्षांपुढील जवळपास २ हजार नागरिक आहेत. गावात लसीकरणाची सोय नसल्याने त्यांना कासारशिरसी अथवा मदनसुरी येथे जावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ये- जा करण्यासाठी वाहनांची सुविधा नाही. परिणामी, येथील नागरिकांची अडचण होत आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी रामलिंग मुदगड येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी व तालुका आरोग्य अधिका-यांकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी व नागरिकांच्या सह्या आहेत.