खंडाळी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:49+5:302021-04-03T04:16:49+5:30
... प्लास्टिक पिशव्यांचा बिनधास्त वापर शिरुर अनंतपाळ : शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातली आहे. मात्र, तालुक्यात बिनधास्तपणे प्लास्टिक ...

खंडाळी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण
...
प्लास्टिक पिशव्यांचा बिनधास्त वापर
शिरुर अनंतपाळ : शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी घातली आहे. मात्र, तालुक्यात बिनधास्तपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील व्यापारी, भाजीपाला, फळविक्रेते, किराणा दुकानदार, खाद्य वस्तू विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
...
कासारशिरसी येथे शिवजयंती उत्साहात
कासारशिरसी : कासारशिरसी येथे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे, मयूर गबुरे, सचिन कडतने, राम डांगे, बलवीर पांडे, नागेंद्र स्वामी, अनंत महामुनी, श्रीशैल्य चिंचनसुरे, प्रशांत स्वामी, अमोल पाठक आदी उपस्थित होते.
...
घनसरगावचा वीजपुरवठा सुरळीत करावा
रेणापूर : पानगाव १० खेडी योजनेअंतर्गत घनसरगावास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तो वीजपुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी सरपंच शरद दरेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे निवेदनाद्वारे केला आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने गावच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
...
पाणीटंचाईमुळे पानगावातील नागरिकांची पायपीट
पानगाव : पानगावला पाणीपुरवठा करणा-या भंडारवाडी येथील पाणी योजनेचा वीजपुरवठा महावितरणने थकित वीजबिलापोटी तोडला आहे. त्यामुळे महिनाभरापासून गावातील नळाला पाणी येणे बंद झाले आहे. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. १ हजार लिटर पाण्यासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत.
...
नैसर्गिक द्राक्ष बागेची केली पाहणी
बेलकुंड : आशिव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी किशोर कुंभारे यांच्या नैसर्गिक द्राक्ष बागेची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी करुन विविध रोगांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना सांगितल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, कृषी मंडळ अधिकारी गणेश राऊत, कृषी पर्यवेक्षक विकास लातूरे, कृषी सहाय्यक प्रतिभा खडके, बालाजी घोडके, अमित फुलसुंदर आदी उपस्थित होते.