कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:22+5:302021-05-08T04:20:22+5:30

नागरिकांनी मनात भीती न बाळगता लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव ...

Vaccination is important to prevent corona | कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे

नागरिकांनी मनात भीती न बाळगता लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. अक्का फाऊंडेशनच्या वतीने टास्क फोर्स कार्यान्वित केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन सुमारे एक हजार लसीचे डोस तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालय कासार सिरसी येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध असून, येथील डॉ. श्री. शेषराव शिंदे, डॉ. विश्वेश कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता भोसले, डॉ. बालाजी सावंत, आरोग्य परिचारिका पांचाळ आदी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधून जेवणाची व्यवस्था, औषधोपचाराविषयी विचारपूस केली. येणाऱ्या काळात औषधाची कुठलीही कमतरता भासणार नाही याचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय कासार सिरसी येथे ऑक्सिजनची कमी भासल्यामुळे अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले. येथील असलेली विद्युतपुरवठ्याची अडचण पाहता जनरेटरची व्यवस्था करण्याचे नियोजन केले. याप्रसंगी माजी कृषी सभापती बजरंग जाधव, ज्ञानेश्वर बरमदे, उपसरपंच बडेसाब लक्कडहारे, बाबू लामजने उपस्थित होते.

Web Title: Vaccination is important to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.