औश्यातील पाच आरोग्य उपकेंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:11+5:302021-04-09T04:20:11+5:30
आलमला येथील उपकेंद्रात पंचायत समिती सभापती गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सरपंच निलंगेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तिथे ...

औश्यातील पाच आरोग्य उपकेंद्रात लसीकरण
आलमला येथील उपकेंद्रात पंचायत समिती सभापती गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सरपंच निलंगेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तिथे १७६ जणांनी लस घेतली. नागरसोगा येथील उपकेंद्रात सदरील मोहिमेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य चाबुकस्वार यांच्या हस्ते झाले. यावेळी सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ७७ जणांनी लसीकरण करून घेतले. मंगरुळ येथील उपकेंद्रात जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी परिक्षित पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, पं.स. सदस्य बकुळाबाई दूधभाते आदी उपस्थित होते. तिथे १८१ जणांनी लस घेतली. तावशी ताड येथील उपकेंद्रात सरपंच सुनीता घाडगे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर रोडगे यांच्यासह नागरिक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ७० जणांना कोविड लस देण्यात आली.