लातूर शहरातील ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:10+5:302021-06-20T04:15:10+5:30
लातूर : महापालिकेच्या वतीने ३० वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. रविवारपासून लसीकरण मोहीम सुरू होत असून, ...

लातूर शहरातील ३० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण
लातूर : महापालिकेच्या वतीने ३० वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. रविवारपासून लसीकरण मोहीम सुरू होत असून, शहरातील तरुणांनी मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
रविवारी शहरातील महापालिकेच्या सात केंद्रांवर तसेच दोन फिरत्या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू राहणार आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, दयानंद महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, यशवंत शाळा, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र राजीवनगर, विवेकानंद चौक, आरोग्य केंद्र मंठाळेनगर या सात केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. मोबाइल पथक मनपा शाळा क्र. २८, इंडियानगर व रुकय्या बेगम शाळा, अंजलीनगर या ठिकाणी लसीकरणाचे काम करणार आहे. पहिल्या सात लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४ तसेच ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस दिली जाणार आहे. मोबाइल पथक केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देणार आहे. सर्वच ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध असून, ३० ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना फक्त पहिला डोस दिला जाईल. सर्वच केंद्रावर ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे. ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण होणार असून, शहरातील तरुणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.