अहमदपुरात १८८१ जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:23+5:302021-05-12T04:20:23+5:30

पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड लस उपलब्ध झाली. अहमदपुरात ४००, अंधोरीत २००, ...

Vaccination of 1881 persons in Ahmedpur | अहमदपुरात १८८१ जणांना लस

अहमदपुरात १८८१ जणांना लस

पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड लस उपलब्ध झाली. अहमदपुरात ४००, अंधोरीत २००, हडोळतीत २११, शिरूर ताजबंदमध्ये ४७०, सताळा येथे २००, किंनगावात २०० लस उपलब्ध होत्या. मात्र, नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. अहमदपुरातील ग्रामीण रुग्णालयात सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यात केवळ २०० लसी असल्यामुळे टोकन पद्धतीने लस देण्यात आली. २०० लसींसाठी ५०० नागरिक होते. त्यामुळे गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून नागरिकांना फिजिकल डिस्टन्स राखण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर तालुक्यातील शिरूर ताजबंद, हडोळती येथेही डोसपेक्षा नागरिक दुप्पट होते. त्यामुळे अधिक डोस द्यावा लागला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे नोंदणी पद्धतीने लसीकरण करण्यात आले. त्यासाठी आरोग्याधिकारी डॉ. सुनील दासरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, लसीकरणाचे प्रमुख डॉ. सूरज सिंहाते, आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 1881 persons in Ahmedpur