लस घेणाऱ्या नागरिकांचा मास्क, पुष्पगुच्छ देऊन सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:04+5:302021-04-08T04:20:04+5:30
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ. शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस ...

लस घेणाऱ्या नागरिकांचा मास्क, पुष्पगुच्छ देऊन सत्कार
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ. शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल सरचिटणीस डॉ. सुनील बनशेळकीकर, शहराध्यक्ष डॉ. भाग्यश्री घाळे, सचिव डॉ. विक्रम माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बिरादार, धन्वन्तरी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, शफीभाई हाशमी, प्रदीप जोंधळे, प्रेम तोगरे, अजय शेटकार, बंटी आलमकेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कोव्हीड लस ही पूर्णपणे सुरक्षीत आहे. प्रत्येकाने लस घ्यावी आणि लस घेतल्याने कोव्हीड होत नाही असे नसून, लस घेतल्यानंतरही प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाने सांगितलेले सर्व नियम आणि बचावात्मक उपाय याेजनांचे काटेकोरपणे पालन करून आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर्स सेलच्या शहराध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले आहे. यावेळी लसीकरण केंद्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.