कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लामजना येथील ऊर्स रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:30+5:302021-04-07T04:20:30+5:30

या ऊर्समध्ये लामजना, तपसे चिंचोली परिसरातील भाविक हजेरी लावतात. या ऊर्ससाठी कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील भाविक माेठ्या संख्येने ...

Urs canceled at Lamjana on the background of the corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लामजना येथील ऊर्स रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लामजना येथील ऊर्स रद्द

या ऊर्समध्ये लामजना, तपसे चिंचोली परिसरातील भाविक हजेरी लावतात. या ऊर्ससाठी कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील भाविक माेठ्या संख्येने दाखल हाेतात. ऊर्समध्ये कव्वाली, रहाटपाळणे, कुस्त्यांचे फड रंगतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदरचा ऊर्स रद्द करण्यात आला आहे. गतवर्षी लॉकडाऊन दरम्यान रहाटपाळणे व्यवसायिक अडकून पडले हाेते.

यात्रेत

रहाटपाळणे, मोठमोठी दुकाने थाटून बसतात. मात्र, लातूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऊर्सवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे.

लामजना, तपसे चिंचोली परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने यंदा यात्रेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने यात्रा रद्द करण्याचा निर्मण घेण्यात आला आहे. भाविकांनी ऊर्सासाठी लामजना येथे येऊ नये, असे आवाहन लामजना ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Urs canceled at Lamjana on the background of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.