अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:09+5:302021-05-03T04:15:09+5:30
गेल्या चार दिवसांपासून सतत वातावरणात बदल होत आहे. दुपारपर्यंत कडक उन्हं जाणवत आहे तर त्यानंतर जोरदार वारे वाहून अवकाळी ...

अवकाळी पाऊस, वीज पडून तीन जनावरे दगावली
गेल्या चार दिवसांपासून सतत वातावरणात बदल होत आहे. दुपारपर्यंत कडक उन्हं जाणवत आहे तर त्यानंतर जोरदार वारे वाहून अवकाळी पाऊस होत आहे. रविवारी दुपारी २ ते ३ वा. च्या सुमारास मुळकी व उमरगा कोर्ट येथे वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, मुळकी येथील शेतकरी नानासाहेब सूर्यवंशी यांच्या गट क्र. १५४ मधील आखाड्यावर वीज कोसळली. त्यात दोन बैल जागीच ठार झाले. या बैल जोडीची किंमत १ लाख ४५ हजार आहे. दरम्यान, उमरगा कोर्ट येथील गट क्र. ४४० मध्ये वीज पडली. राजेंद्र लोहारे यांच्या शेतात वीज पडल्याने एक म्हैस दगावली. तिची किंमत ९० हजार असल्याचे शेतक-याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच तलाठी निळकंठ कुलकर्णी यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.