विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:53+5:302021-04-08T04:19:53+5:30
२० हजारांत दोन शिधापत्रिका अपात्र लातूर : आधार क्रमांकासह शिधापत्रिका संलग्न करण्यात येत आहेत. त्यामुळे बोगस किंवा अपात्र शिधापत्रिकेचा ...

विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू
२० हजारांत दोन शिधापत्रिका अपात्र
लातूर : आधार क्रमांकासह शिधापत्रिका संलग्न करण्यात येत आहेत. त्यामुळे बोगस किंवा अपात्र शिधापत्रिकेचा शोध लागण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात २० हजारांमध्ये केवळ दोन शिधापत्रिकाधारक अपात्र आढळून आले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम स्थगित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
प्रभागात अंतर्गत रस्ते, नाल्यांची दुरवस्था
लातूर : शहरातील प्रकाशनगर, विकासनगर, कपिलनगर, चौधरीनगर भागात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नाल्याही दैनंदिन स्वच्छ केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नाल्या तुंबल्यामुळे नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावर येते. शिवाय, अनेक सिमेंट रस्ते उखडले आहेत. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
पूर्वसूचना न देता वीज पुरवठा तोडला
लातूर : पूर्वसूचना न देता जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उजव्या कालव्यावरील विद्युत पंपांचा वीज पुरवठा तोडला. यामुळे शेतकरी संतप्त झाले. तांदूळजा परिसरात जलसंपदा विभागाने ही कारवाई केली. मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी प्रत्येकी वीज पंपाचे तीन हजार भरूनही वीज पुरवठा बंद केला आहे.