उदगीरकरांना लवकरच मिळणार लिंबोटीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:54+5:302021-06-09T04:24:54+5:30

लिंबोटी येथील पंपिंग स्टेशनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष ...

Udgirkar will soon get lemonade water | उदगीरकरांना लवकरच मिळणार लिंबोटीचे पाणी

उदगीरकरांना लवकरच मिळणार लिंबोटीचे पाणी

लिंबोटी येथील पंपिंग स्टेशनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजपा उदगीर शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, काँग्रेसचे गटनेते मंजूर खान पठाण, सय्यद ताहेर हुसेन, नियोजन सभापती ॲड. सावन पस्तापुरे, नगरसेवक राजकुमार भालेराव, गणेश गायकवाड, श्रीरंग कांबळे, रामेश्वर पवार, पप्पू गायकवाड, अनिल मुदाळे, राजू मुक्कावार, फैजुखान पठाण, साईनाथ चिमेगावे, आनंद बुंदे, ॲड. दत्ताजी पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता नागरगोजे, नगर परिषदेचे अभियंता सुनील कटके, गणेश पाटील आदी उपस्थित होते. उदगीर शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या लिंबोटी येथील पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. १५०० एचपी क्षमतेचे पंप बसविण्यात आले असून, प्रतितास आठ लाख लीटर पाणी या यंत्रणेद्वारे डिस्चार्ज होणार आहे, अशी माहिती यावेळी राहुल केंद्रे यांनी दिली.

Web Title: Udgirkar will soon get lemonade water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.