उदगिरात भाजपाचे महावितरण कार्यालयात टाळे ठोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST2021-02-06T04:34:22+5:302021-02-06T04:34:22+5:30
‘कोरोना’च्या काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव बिले देण्यात आली असून, या वीज बिलांचा भरणा न केल्यास कनेक्शन तोडण्यात येईल. ...

उदगिरात भाजपाचे महावितरण कार्यालयात टाळे ठोको आंदोलन
‘कोरोना’च्या काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव बिले देण्यात आली असून, या वीज बिलांचा भरणा न केल्यास कनेक्शन तोडण्यात येईल. अशी नोटीस माहाविरणने ७५ लाख वीज ग्राहकांना दिली आहे. याचा निषेध म्हणून भाजपाच्या वतीने कार्यालयाला टाळे ठोको अंदोलन केले. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुंगे, ज्येष्ठ नेते अविनाश रायचूरकर, तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, जिल्हा सचिव नगरसेवक गणेश गायकवाड, शहर सरचिटणीस पप्पू गायकवाड, शहर सरचिटणीस नागेश अस्तुरे, माजी सभापती विजयकुमार पाटील, जि.प. सदस्य शिवशिवे, माजी उपसभापती रामदास बेंबडे, सभापती मनोज पुदाले, सभापती ॲड. सावन पासत्तापुरे, नगरसेवक रामेश्वर पवार, राजकुमार मुक्कावार, संजीव केंद्रे, डॉ. कोठारे, हनुमंत हंडरगुळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल निडवदे, आनंद बुंदे, अमर सुरवंशी, सुनील गुडमेवार, संजय शाहीर, राम जाधव, गरड, जिवने ताई, विकास जाधव, राजकुमार आंधारे, संतोष बडगे आदींसह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.