उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:43+5:302021-03-15T04:18:43+5:30

उदगीर शहरात आयाेजित केलेल्या मराठा सेवा संघ पदाधिकारी बैठकीत ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. ...

Udgir will develop the constituency comprehensively | उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार

उदगीर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार

उदगीर शहरात आयाेजित केलेल्या मराठा सेवा संघ पदाधिकारी बैठकीत ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील नावाडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी भारतकुमार चव्हाण, आम्रपाली सुरवसे, प्रकाश साखरे, यशवंत बिरादार, अतुल काकडे, समीरभाई शेख, सोमनाथ सुरवसे, विजयकुमार पाटील यांची उपस्थित होती. कृषी परिषदेचे प्रदेश सचिव प्रा. विवेक सुकने, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढगे यांनी संजय बनसोडे सत्कार केला. यावेळी डॉ. माधवी जाधव, डाॅ. वर्षा कानवटे, नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी भामाबाई कांबळे, पोलीस नाईक ज्योती नारायण कोरनुळे, पोलीस अंमलदार संगीता राघोबा घोडके, परिचारिका पंचफुला गणपतराव पवार, क्रांती विठ्ठल सांगवे यांचा कोविड योद्धा म्हणून राज्यमंत्री बनसाेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यमंत्री बनसाेडे म्हणाले, मराठा समाजाने वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास आपण बांधकामासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, मराठा स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, शेड आणि बोअरसाठी २५ लाखांचा निधी मंजूर करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माधव हलगरे, भरत पुंड, प्रा. संभाजी जाधव, ज्ञानेश्वर नकुरे, गणपत गादगे, अंकुश हुंडेकर, कालीदास बिरादार, प्रा. भास्कर मोरे, राजकुमार कानवटे, नारायण जाधव, प्रा. मारुती जाधव, युवराज जोमदे दीपक मिरजकर, धनाजी भोसले, बबीता पाटील, प्रतिभा मुळे यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Udgir will develop the constituency comprehensively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.