उदगीर तालुक्यात २ हजार १९ मतदारांनी दिली ‘नाेटा’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:45+5:302021-01-21T04:18:45+5:30

उदगीर तालुक्यात साेमवार, १५ जानेवारीला ५५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक नकारार्थी मतदान वाढवणा बु. ग्रामपंचायतीत ...

In Udgir taluka, 2 thousand 19 voters preferred 'NATA' | उदगीर तालुक्यात २ हजार १९ मतदारांनी दिली ‘नाेटा’ला पसंती

उदगीर तालुक्यात २ हजार १९ मतदारांनी दिली ‘नाेटा’ला पसंती

उदगीर तालुक्यात साेमवार, १५ जानेवारीला ५५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक नकारार्थी मतदान वाढवणा बु. ग्रामपंचायतीत झाले आहे, तर कुमदाळ ग्रामपंचायतीत केवळ एका मतदाराने नकारार्थी मतदान केले आहे. आडोळवाडी ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत मात्र एकाही मतदाराने नकारार्थी मतदान केले नाही. हे विशेष... उदगीर तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीसाठी साेमवारी शांततेत मतदान झाले. या निवडणुकीत ७९ हजार ५५८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यापैकी २ हजार १९ मतदारांनी आपल्या एकाही उमेदवाराला आपली पसंती न देता नकारार्थी मतदान केले आहे. वाढवणा बु. ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत १८१ मतदारांनी एकाही उमेदवाराला आपली पसंती दिली नाही. निडेबन १५६, नळगीर १०५, हेर १२५, हाळी १०३, हंडरगुळी ११२ जणांनी नकारार्थी मतदान केले आहे. मांजरी ५, मल्लापूर ९, माळेवाडी ९, होनीहिप्परगा १०, गंगापूर ग्रामपंचायतीसाठी सातजणांनी नकारार्थी मतदान केले आहे.

Web Title: In Udgir taluka, 2 thousand 19 voters preferred 'NATA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.