उदगीर-पुणे शिवशाही बस खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:48+5:302021-03-13T04:35:48+5:30
उदगीरचे स्थानक प्रमुख यशवंतराव कानतोडे म्हणाले, ‘उदगीर बसस्थानकातून शुक्रवारी सकाळी ८.१५ वा. उदगीर- पुणे (एमएच ०९ / ईएम ९७५८) ...

उदगीर-पुणे शिवशाही बस खड्ड्यात
उदगीरचे स्थानक प्रमुख यशवंतराव कानतोडे म्हणाले, ‘उदगीर बसस्थानकातून शुक्रवारी सकाळी ८.१५ वा. उदगीर- पुणे (एमएच ०९ / ईएम ९७५८) ही शिवशाही बस २० प्रवासी घेऊन पुण्याकडे निघाली होती. उदगीरपासून सहा किलोमीटरवर अंतरावर उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करताना बाजूच्या खड्ड्यात पडली. उदगीर ते लातूर या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे चालकाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरुमाचा अंदाज आला नाही. बसची चाके मुरुमात रुतली व खड्ड्यात पडली. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी अथवा जीवित हानी झाली नाही. बसमधील प्रवाशांना मुकामार लागल्याने त्यांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या अपघातामुळे या रस्त्यावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.