उदगीर न.प. उपाध्यक्षपदी भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2017 21:13 IST2017-01-06T21:13:59+5:302017-01-06T21:13:59+5:30
येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुधीर भोसले विजयी झाले.

उदगीर न.प. उपाध्यक्षपदी भोसले
>ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 6 - येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुधीर भोसले विजयी झाले.
उदगीर, दि. 6 - येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे सुधीर भोसले विजयी झाले.
उपाध्यक्षपदासाठी भाजपाचे सुधीर भोसले, काँग्रेसचे मंजुर खान पठाण व एमआयएमचे सय्यद ताहेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भाजपाचे सुधीर भोसले यांना १९ काँग्रेसचे मंजुर खान पठाण यांना ९ तर एमआयएमचे सय्यद ताहेर यांना ६ मते मिळाली. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष बसवराव बागबंदे यांनी भाजपाचे सुधीर भोसले हे उपाध्यक्षपदी विजयी झाल्याचे जाहीर केले़
स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे अॅड़ दत्ताजी पाटील, डॉ़ धनाजी कुमठेकर, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे तर एमआयएम चे शेख फैय्याज नसरुद्दीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ या निवडीनंतर उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे यांनी नुतन उपाध्यक्ष सुधीर भोसले, स्वीकृत सदस्य अॅड़ दत्ताजी पाटील, डॉ़ धनाजी कुमठेकर यांचा सत्कार केला़ यावेळी मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती़