उदगीर अ. भा. बालकुमार साहित्य संस्थेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST2021-01-13T04:49:19+5:302021-01-13T04:49:19+5:30
बालसाहित्याचे सदरील पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेला जाहीर करता आले नव्हते. ते रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यात राजकुमार बेंबडे ...

उदगीर अ. भा. बालकुमार साहित्य संस्थेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
बालसाहित्याचे सदरील पुरस्कार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेला जाहीर करता आले नव्हते. ते रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यात राजकुमार बेंबडे स्मृती पुरस्कार पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या ‘पाखरमाया’ या बालकविता संग्रहास, लक्ष्मीबाई विठोबा केदार स्मृती पुरस्कार औरंगाबाद येथील सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ या बालनाट्य संग्रहाला, तर विजयकुमार दत्तात्रय बेंबडे स्मृती पुरस्कार सांगली येथील वर्षा चौगुले यांच्या ‘मैत्री’ या बालकथा संग्रहाला जाहीर झाला आहे.
लवकरच एका कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रतिनिधी संजय ऐलवाड, अध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल दा. पठाण यांनी दिली. यावेळी मराठवाडा समन्वयक प्रशांत शेटे, उपाध्यक्ष दयानंद बिरादार, सहकार्यवाह अनिता यलमटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे, सदस्य शिवकुमार डोईजोडे, विक्रम हलकीकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, ज्योती डोळे, चंद्रदीप नादरगे, चंद्रशेखर कळसे आदी उपस्थित होते.