उदगीर बाजार समिती शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे हित जोपासणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:21+5:302021-04-03T04:16:21+5:30
उदगीर मार्केट यार्डात नव्याने बसविण्यात आलेल्या हायमस्ट एलईडीच्या उद्घाटनप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते. याप्रसंगी उपसभापती रामराव बिराजदार, दाल मिल ...

उदगीर बाजार समिती शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे हित जोपासणारी
उदगीर मार्केट यार्डात नव्याने बसविण्यात आलेल्या हायमस्ट एलईडीच्या उद्घाटनप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते. याप्रसंगी उपसभापती रामराव बिराजदार, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंडे, अडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे, व्यापारी सुरेश महाजन, संचालक सुभाष धनुरे, संतोष बिरादार, धनाजी जाधव, आदी उपस्थित होते.
यावेळी सभापती पाटील म्हणाले, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल आल्यानंतर त्याच्या खरेदी- विक्रीवरील शुल्क येथील व्यापारी नियमितपणे भरत असल्याने उदगीरच्या बाजार समितीचाच नव्हे तर दालमिल व सोयाबीन मिलच्या माध्यमातून शहराच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. अशा व्यापाऱ्यांना बाजार समितीमार्फत सेवा पुरवणे बाजार समितीचे कर्तव्य आहे. हायमस्ट एलईडीच्या बल्बमुळे रात्रीच्या वेळी काम करताना सोय होणार आहे. याप्रसंगी दालमिल असोसिएशनचे अशोक बाहेती, लक्ष्मीकांत चिकटवार, राजेश महाजन, अडत व्यापारी शांतवीर मुळे, शेषेराव बिरादार, उमेश पांढरे, मल्लिकार्जुन काळगापुरे, प्रवीण बागडी, शिवा पेटे, ज्ञानेश्वर बिरादार, औदुंबर येरनाळे, मधुकर खंडागळे, सुरेश डोंगरे, बाजार समितीचे प्रभारी सचिव निवृत्ती हंगरगे, उपसचिव हबीब दुरानी, सतीश पाटील, आदी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत
सोयाबीन व शेतमालाच्या गंजीस अचानक आग लागून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट येते. अशा घटना तालुक्यात अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे उदगीर बाजार समितीअंतर्गतच्या शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे संकट आल्यास त्यांना तातडीची मदत म्हणून बाजार समितीकडून २५ हजारांची मदत व नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पडून शेतकऱ्यांचे पशुधन दगावल्यास अशा शेतकऱ्यांना २१ हजारांची मदत बाजार समितीकडून करण्यात येणार आहे. याबाबत बाजार समितीने ठराव घेऊन पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने शासनाने खास बाब म्हणून मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.